Elections

हा माझा पहिला ब्लाॅग आहे . सर्व निवडणुकांच्या निकांलाची वाट पाहत आहेत उत्सुकतेने. काय होणार ? कोण पंतप्रधान होणार ?

काल मला विमानात माझ्या शेजारी एक पाकिस्तानी तरूण होता. त्याला पण भारतात काय होणार ह्याची उत्सुकता आहे . तो सांगत होता की पाकिस्तानात इरमानखान चे सरकार अस्थिर आहे व सैन्य नेहमीच दबाव आणीत असते . त्याने अप्रत्यक्ष पणे कबूल केले की पाकिस्तान अतिरेक्यांना प्रोत्साहन देते कारण ते अतिरेके चीन विरूद्ध सुद्धा लढत असतात . पाकिस्तानची परिस्थिती फार कठीण आहे . सेनेतील अधिकारी मजेत राहतात. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे . तो सांगत होता की त्याला दुबईत नोकरी मिळाली असतीपण तेथे पाकीस्तानी मुसलमानांना तेथे काही मान मिळत नाही. तसेच त्याने सांगितले की संगणक क्षेत्रात जास्त भारतीय आहेत . पाकिस्तानी तसे कमी आहेत. तो लाहोरचा होता व म्हणाला की आपण हिंदीत बोलूया का ?

बधू या आता दोन दिवसांनंतरच काय होते

 

 

 

 

 

 

 

 

बधू पुढे काय होते .